माझ्या घरी...

Started by धनंजय गवळी, July 17, 2017, 03:55:49 PM

Previous topic - Next topic

धनंजय गवळी

माझ्या घरी सुख हे क्वचितच येत अन् भुक जाता जात नाही.

माझ्या घरी पाय तर सहा आहेत पण चपलांचे जोड दोनच.

माझ्या घरी सायंकाळी दिवा लागो न लागो पण रात्रीच्या जेवणाची चिंता जरूर लागते.

माझ्या घरी काॅमप्युटर एक ही नाही, पण ऊंदरं खुप सारे आहेत.

माझ्या घरी शतपावली करण्यासाठी कोणी बाहेर जात नाही, अरे दोन घास पचण्यासाठी असा किती वेळ?

माझ्या घरी पाणी हे माठात कमी आणी डोळ्यांमध्ये जास्त असतं.

माझ्या घरी तांदुळ कधी नाही शिजत तर कधी शिजते पण कामासाठी वणवण फिरून चप्पल जरूर झिजते.

माझ्या घरी बैल तर एक ही नाही पण शेतामध्ये नांगरणी जरूर होते.

माझ्या घरी ऊपाशी राहणं ही परिस्तिथी नाही, छंद आहे.

माझ्या घरी झोपल्यावर स्वपनांनमध्ये करतो मी स्वच्छंद स्वारी पण क्वचिताच पाहिली आहे मी डब्यामध्ये ज्वारी.

माझ्या घरी एक ही वाहन शक्ती नाही पण रोज ४ मैल चालत जाऊन पैशांच्या तुकड्यासाठी काम करण्याची सहन शक्ती जरूर आहे.

माझ्या घरी आरोग्यासाठी एकच वैद्द तो म्हणजे नैवेद्द.

माझ्या घरी अशी हि नांदते गरिबी...

~ धनंजय गवळी (Twitter: @djaywalebabu)