कधी सोडणार तुम्ही

Started by कदम, July 18, 2017, 10:32:47 AM

Previous topic - Next topic

कदम


व्यसनांचा हा विळखा,कधी सोडणार तुम्ही
दारूचा तो ग्लास,कधी फोडणार तुम्ही

विडी तंबाकूने झाली,देहाची तुमच्या काडी
चुन्याची ती पिचकारी,कधी सोडणार तुम्ही

ढिलमढाल मांस झालं,सांधी खिळखिळली
मती तुमची जागेल केंव्हा,नशेत जी रेंगाळली

पानाची करून गोळी,लालभडक मारतो पिचकारी
गिळून गुटखा सुगंधित,शमेल का पोटची चिंगारी

घोट दारूचा भरणं,झुरका सिगारेटचा ओढणं
मदिरेत असं लडखळणं,कधी सोडणार तुम्ही