जिभेचे चोचले

Started by sanjay limbaji bansode, July 24, 2017, 09:09:31 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

तिला बदलने शक्य नव्हते
म्हणून
तिच्यासाठी मी
सारे काही बदलले.
सकाळचा नाश्ता, जेवण्याची हॉटेल
घरातला मसाला,हॉटेलचा मेनू.
शेवटी थकलो.
आजकाल तिला
जुने काहीच आवडत नाही.
तिची आवड
पुरवता पुरवता
माझ्या नाकी नऊ आले.
तिची फर्माईश
दिवसेंदिवस वाढतच चालली होती.
हल्ली तिला तर
मॅकडोनाल्ड अन् पिझ्झाहट
जाम आवडायला लागला.
मी तरीही थकलो नाही
मीही माझ्या
जिभेचे चोचले
पुरवतच राहिलो.

Sanjay L. Bansode
9819444028