मागच्या हिवाळ्यात

Started by Kumar Sanjay, August 05, 2017, 09:42:54 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

मागच्या हिवाळ्यात
इथे शांतता होती
पाईनच्या पांनावरुनी
बर्फ घसल्यांचा
आवाज इथे यांयचा

चर्चमधील  प्रार्थना
गुणगुणतच एक वेडा
चित्रकार
दडपशाहीच्या विरोधात
इथेच चित्रे काढायचा

इथूनच हुकूमशाहीच्या
विरोधात लढण्यासाठी
तरुण जायचे
अलविदा म्हणतानांचा
Flying kiss मी इथेच
पाहिला
मागच्या हिवाळ्यात

मागच्या हिवाळ्यात मी
कवि होतो, आता नाही
आता इथे रणगाडे आहे
अन्
दूरवर दिसणारी सैनिकांची
गदीॅ
आता इथे कवि असणे पाप
आहे ...
सैनिकांच्या मागे गिलोटिन
तयार असते 
मुडके उडवण्यासाठी .....

# कुमार संजय