तुझ्याविना मी

Started by ganesh bunde, August 06, 2017, 10:26:16 AM

Previous topic - Next topic

ganesh bunde

      तुझ्याविना मी

तु आज ईथे असायला हवी होती
माझ्या समवेत रमायला हवी होती
तु जेव्हा समिप होती, माझी लायकी कमीच होती
आज माझे हे यश पहायला तू हवी होती ||1||
आजही आवडते मला तूझ्यासोबत रमायला
जेव्हा तू होती पण मी नव्हतो कमवायला
आज या यशाचा हिस्सा व्हायला तु हवी होती ||2||
तु नाही आहे याची मला जाणिव आहे
सगळ असूनही फक्त तुझीच उणिव आहे
ही उणीव भरवायला तू हवी होती ||3||
कधी स्वप्ने रंगवायचो मी सुखी संसाराची
तूझ्या नि माझ्या आपल्या गोड घराची
ही स्वप्नं खरी करायला तू हवी होती ||4||
मी तर तूझ्यावाचुनी अधुरा
हा खेळ तूझ्याविना अपुरा
हा खेळ पुर्ण कराया तू हवी होती ||5||
स्वप्न शेवटी स्वप्नचं असते
ते कधी खरी होत नसते
सोडून गेलेले परत येत नसते
शेवटी जीवन पुढे नेत असते
खंत एकची आज, तू जगायला हवी होती ||6||
                          कवी : घनश्याम (9595941269)