किनारा ..

Started by Çhèx Thakare, August 09, 2017, 05:46:02 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

किनारा ..

घेतले मी हुंदके, काठावर त्या रोजच्या ..
जिथे अश्रुंचा तुझ्या, किनारा तो होता ..

मी विसर्जित केली तेव्हा, ती पत्रे गोड आपुली ..
ज्यावर प्रेमाचा आपला, ऊतारा तो होता ..

मी स्मरत गेलो काही, अठवणी कटू त्या आपुल्या ..
जिथे नयनांचा तुझ्या , पहारा तो होता ..

मी गाळत गेलो तेव्हा, अश्रुंना त्या माझ्या ..
कारण सोबतीला स्मृतींचा, सहारा तो होता ..

घायाळ झाले डोळे माझे, शोधात तेव्हा तुझ्या ..
ज्या वाटेवर तुझा, ईशारा तो होता ..

भेटले न मला काही, त्या रस्त्यात तिथे ..
माझ्या साठी तुझा हा, जवाब करारा तो होता ..

वाहत गेलो पुन्हा, डोहात गोड तुझ्या ..
जिथे गोड स्वप्नांचा, दरारा तो होता ..

भेटली तू पुन्हा, काठावर त्या रोजच्या ..
ऊगवला अंगावर पुन्हा, शहारा तो होता ..

© चेतन ठाकरे


जे.डी.भुसारे

गझलेचा मिटर मला समजत नाही पण गझल असो की कविता खूप छान.

Çhèx Thakare

ti gazal nahiye tashi vatate pn nahi ..