भेट

Started by १. मनिषा गुर्जर, August 10, 2017, 08:32:21 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

नदीकाठी एकटी पाहून छेडतो शिळ घालुन वारा
कळी गाली खुलताना चोरुन पाहतो आसमंत सारा

फुलणारे ते फुल मोहवुन जाते नजर नजरेशी बोलून जाते
हिरव्या रस्त्यात दोन घडी भान हरपून जाते

शब्द मूक पण गालावर खुणा भेद सांगते
मन भ्रमराचे त्या फुलात गुंतुन जाते

पावसात सारी धरती भिजते धुंद मन तिचे
पहीले गाणे त्या पिरतिचे गाते मन त्याचे