आदरनिंय बापु

Started by santosh mansute, August 15, 2017, 09:19:58 PM

Previous topic - Next topic

santosh mansute

   
आदरनिंय बापु:-
============
         काव्यांकन:-श्री.संतोष बा.मनसुटे

बापु !  प्रत्येकाच्या पाठिमागे जाती
     जातीधर्मांच्या शक्ति आहेत
     मात्र तुमच्या पाठिमागे फक्त
      सरकारी कार्यालयांच्याच भिंती आहेत.

बापु तुमच अहिंसेच शस्त्र आज
हद्दपार झाल आहे.
भिंती वरचा फोटो तुमचा
नोटेवरती आला आहे.

नोटेवरच्या प्रतीमेवर तुमच्या
रक्ताचे डाग पडत आहेत.
ह्याच पैशांच्या सुपार्या देत
रक्ताचे तांडव आज घडत आहेत.

बापु २ आँक्टोंबर आणि ३० जानेवारीच्या दिवशी पुतळा
दुधा दह्याने धुतल्या जातो.
एरवी मात्र गंजिपत्ता
पुतळ्या मागेच मांडल्या जातो.

भारतीयांचा ताईद रे तू
आज म्हातार्यांचीच क्रांती आहेस.
युवक वर्गात मात्र मजबुरी का नाम
महात्मा गांधी आहेस.

बापु तुम्हीच म्हणत होता ना
या देशात रामराज्य येईल.
तुम्हाला स्वप्नातही वाटल होत काय?
या देशातुन रामाच अस्तीत्वच हद्दपार होइल.

बापु या देशात येन्याचा तुमचा
विचारहि आज फसलाआहे.
कारण तुम्हाला मारनारा नथुराम एक नाही
प्रत्येक घराघरात बसला आहे.

प्रत्येक घरा घरात बसला आहे..

          कवि :-
     श्री.संतोष बा.मनसुटे.
     प्रा.शिक्षक.
    जि.प.नाशिक 9099464668
Santosh Mansute