भेटतो स्वत:ला

Started by शिवाजी सांगळे, August 23, 2017, 05:02:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भेटतो स्वत:ला

घेऊन आरसा मी का पाहतो स्वत:ला?
शोधात मीच माझ्या का भेटतो स्वत:ला

रंगात गुंतलेल्या या पिंजऱ्यात साऱ्या
बांधून भोवताली का पाळतो स्वत:ला

सारा प्रवास येथे ना सापळा ठरावा
रेट्यात माणसांच्या का घोळतो स्वत:ला

रात्री गुत्यात थोडा जाऊन काय आलो
घेवून घोट हाला का जाळतो स्वत:ला

कष्टास जुंपलेली काया चिपाड झाली
गेली पिळून सारी का गाळतो स्वत:ला

झोकून दे स्वत:ला स्पर्धेत या जगाच्या
जिंकायचे तुला रे का टाळतो स्वत:ला

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९