फुल

Started by Ravikumar Borkar, August 27, 2017, 08:10:44 PM

Previous topic - Next topic

Ravikumar Borkar

           फुल ....

फुल ते नाजूकसं
कधी उमलणार,
दाही दिशा त्याचाच
सुगंध कधी दरवळणार..

खट्याळ तो वारा
त्याला सतत छळतोय
त्याच्या सुगंधासाठी तिथेच
तासन् तास घुटमळतोय...

दवबिंदुची ही रोज
शर्यत ती लागतेय,
कोण गोड झोपेतुन
त्याला लवकर उठवतेय..

एक दिवस ते फुलते
अन्  सर्वांनाच आनंदून सोडते।
मग काय त्याला पहायला
जणू सर्वांचींच गर्दी जमते...

ते आनंदाने इकडून तिकडे
मान डोलाऊन हसत असते,
त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांना
काहीतरी ते भेट  देत असते...

सर्वांचा त्याला भेटण्यामागे
काहीतरी स्वार्थ आहे,
पण त्याला माहीत आहे,
आपलं आयुष्य दुसर्यांसाठी
अर्पण करण्यातच खरा अर्थ आहे....
     
रविकुमार बोरकर..