बाप्पा तुम्हि पुढच्या वर्षी येवुच नका

Started by santosh mansute, September 02, 2017, 08:20:29 AM

Previous topic - Next topic

santosh mansute

बाप्पा पुढच्या वर्षी येवुच नका
====================
          ✍लेखन :- श्री.संतोष बा.मनसुटे.

बाप्पा ~~तुम्ही कशाला आले
देवार्याच्या बाहेर दहा दिवस मनोभावे पाहुणचार खावुन अकरांव्या दिवशी उकिर्डा बनण्यासाठी..अंगार होते काळजात JCB ने तुमच्या मुर्त्या ट्रकात कचरा म्हणुन भरतांना पाहिल्यावर.याच साठी केला होता काय अट्टाहास डोळ्यादेखत आराध्याची विटंबना पाहण्यासाठी......विसर्जन ही संकल्पना  पचनी पडत नाही आम्हाला....त्या तलांवांत ,नद्यांत,विहिरींत,समुद्रात तुमची होणारी अवस्था पाहायला हवी तुमच्या तथाकथित भक्तांनी  विसर्जनाच्या दुसर्या दिवशी जावुन ....नाकाला रुमाल लावुनही मन धजावत नाही पुढच पाऊल टाकायला.....वाटते कधी ,का यावी असला वास हुंगण्याची अन खितपत पडण्याची वेळ माझ्या आराध्यांवर....आपला धर्म सोडला तर कुठल्या अन्य धर्मांत असली स्वकीयांकडुन आपल्या दैवताची अवहेलना होत असल्याचे ऐकीवात नाही...कित्येक जलचर मरतात तुमच्या मुर्त्यांवर मारलेल्या केमीकल रंगाच्या संपर्कात आल्याने...विहिरी गाळाने भरतात तर नद्या प्रदुषनाने....बर तुमच्या  ११ फुट २१ उंच मुर्ती घेण्याचा अट्टाहास तरी का करावा तुमच्याच तथाकथीत गणेश भक्तांनी,अकराव्या दिवशी त्याच बाप्पाची विटंबना करण्यासाठी....शांताबाई अन बाई वाड्यावर या ,यांच तुमच्याशी काय बर नातं असेलं....बर नेमकी दंगल उफाळण्याचा हाच क‍ाळ म्हणजे भाद्रपदात श्रावण....कारण काय तर काही समाजकंटकांनी बाप्पाची विटंबना केली.त्यांच पापपुण्य त्यांच्या कडे पण तुम्ही तरी विसर्जन करुन बाप्पाची विटंबनाच करतात की....बाप्पाला पुजणार्या भक्तांनो कधी जावुन बघा शहर‍ातल्या विसर्जन स्थळी विसर्जनाच्या दुसर्या दिवशी...मग कळेल मोदकाचे नैवद्य घेणारा बाप्पा आता कसा आहे ते...गौराई प्रमाणे जपुनही ठेवता येतील बाप्पा पुढच्या वर्षी बसवण्यासाठी....पण प्रथा मोडण्याच धाडसही लागतच...मला वाटते कधी कधी म्हणाव तुम्हाला पुढच्या वर्षी येवुच नका म्हणुन....पुन्हा हाताने परत हाच अनंत चतुर्दशी नंतरचा अपमान भोगण्यासाठी ......रहा  आमच्या अंतरात्म्यात सदैव आमच्या प्रत्येक क्रुतीचा श्री गणेशा करण्यासाठी.

*॥ गणपती बाप्पा मोरया ॥*
   
  ✍ *लेखन :- श्री.संतोष बा.मनसुटे*
             रोहणा ता.खामगांव जि.बुलडाणा
9099464668
Santosh Mansute