थिगळ

Started by santosh mansute, September 02, 2017, 08:34:24 AM

Previous topic - Next topic

santosh mansute

थिगळं  💭
========
        ✍ लेखन:- श्री.संतोष बा.मनसुटे
     
    बाबा मले नविन डिरेस पाहिजे मनजे पाहिजे!    गोट्यानं आपल्या बाबाला दादाभाऊ ला निर्वानिचा इशारा देत बाजारातून येतांना ड्रेस आणायला सांगितल.
       दादा भाऊ वायरची पिशवी घेत तालुक्याच्या गावाला निघाला.पुन्हा पुन्हा आठवत होता.आज धाकली मुलगी बाली हिला कंपास पेटी आणायची हाय..कारभारीनीच फाटक लुगडं पाहुन त्याच मन कधीच खात होत..आज तिला नवं लुगडं घेण्याचा त्यान ठाम विचार केला होता.जवळ पोळा आला हाय,बैलाचा साज,सणाचा किराणा ,वावरात पिकाला द्यायच खतं,गोट्याचा मास्तर रोजलाच सांगतोय पोराले वह्या घेवुन द्या ,त्या वह्या बी घ्यायच्या हाय...यासाठी कितीबर पैसे लागतील.....या  विचार‍ात झपाझप दादाभाऊ रस्तानं चालत होता..चालीचा वेग जसजसा वाढत होता तसतसा चपलीतला खिळा खोलवर रुतत होता...चपलीला दुरुस्त करत -करत   पार तिचा कस निघाला होता.वाटेत दादाभाऊ चा जिगरी यार सदा  भेटला..सदा ने चपली कडे पाहत डोळे रोखुन दादा ला सांगितल ,हे पाय लेका दाद्या ,किती जीव घेशिन या चपलीचा.घेवुन टाक बाजारातुन नवी एखांदी.

     मान हालवत दादाभाऊने होकार दिला.त्याच्या यादीत पहिल्या नंबर ला टाकायची चप्पल पार तळाला होती....आज सावकाराकडुन ५००० रुपये ५% व्याजान घेतले होते...
     बाजारात जावुन डोक प्रुथ्वीच्या वेगान फिरत होत.एक एक वस्तु घेत त्याची पिशवी भरत होती ,खिसा रिकामा होत  होता अन डोकही..
शेवटी खतं घेतल्यावर उरलेल्या शंभर च्या नोटेला निरखुन पाहत दादा भाऊ विचारात पडला....आजच्या बाजारातही माह्य चप्पल घ्यायच,नव बनियान घ्यायच जमलच नाही...पोराच्या ड्रेस कडे,वह्यांकडे,पोरीच्या कंपास,बायकोच्या लुगड्या कडे पाहुन जरा हसला अन शेजारच्या चप्पल वाल्या कडुन चप्पलीला खिळा मारुन थिगळं लावत घरी निघाला....

      वर पाहत अन मनातल्या मनात बळबळत स्वताशीच बोलत होता ,
   या आभाळाले कोण बर थिगळ तं लावलं नसन नां....भाद्रपद येत हाय  अन अजुन बरसत न्हाई.....हे पैके तुले पाहुनच तं व्याजानं  घेतले रे बावा.....आता काय गहान ठेवत काय मले लेका.....पड न एकदाचा 
रपरप...जीव भल्ला कोरडां झाला नं ........पिकं माना टाकुन राह्यले न माये .........मुत ना बावा येकदा चां .....कायले जीव घेतरे बावा...... कायलेच शेतकरी झालो म्या......एखाद्या सायबा च्या अठी नवकर झालो असतो त त्याची फाटकी चप्पल तरी घातली  असती......दादाभाऊ झपाझप चालत होता अन तसतसा  थिगळातला खिळा पाय कोरत होता......थिगळंच लावल होत नशिबानं .....पाचवीलेच सटवी ठोकुन गेली होती कपायावर थिगळाची पाटी.....शेतकरी झालो......

    ✍ लेखन:-श्री.संतोष बा.मनसुटे
रोहणा ता.खामगांव जि.बुलडाणा
   9099464668
Santosh Mansute