अश्रु झरून गेला

Started by शिवाजी सांगळे, September 03, 2017, 03:53:55 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अश्रु झरून गेला

माथ्यावरून डोंगराच्या सुर्य उतरून गेला
कडाही पाण्या सोबत तेव्हा घसरून गेला

केली मदत जेव्हा त्या गरजू वाटसरूला
उशिरा समजले मलाच तो वापरून गेला

एकाएकी आभाळ आले भरून रात्रीला
अश्रु एक आधी पावसाच्या झरून गेला

मौसम कसा दुधाळ मधाळ आज झाला 
चादर मखमली धुक्याची पांघरून गेला

कोडे तुझ्या विभ्रमाचे पडते असे मनाला
गजरा मोगऱ्याचा असाच विखरून गेला

उतावीळ भेटवाया तो तारकांसी चंद्रमाला
घेऊन सोबती संधेस अंधार पसरून गेला

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९