हरवलेला मी

Started by Dnyaneshwar Musale, September 03, 2017, 04:54:00 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

जेव्हा तु वेणीत एक गुलाबाची
केळी लावतेस
तेव्हा  त्या कळी बरोबर
तुला ही फुलेलं पाहवस वाटतं,

तुझ्या डोळ्यांकडे पाहिलं
की वाटतं, सगळं आभाळ मोकळं आहे
त्यात तु एकटीच लुकलूकनारी चांदणी,
अन मग सगळी रात्र माझी त्या चांदणीला
न्याहाळण्यातच निघुन जाते.

कधी तरी नकळत तु समोर येते
ओठांवर दोन चार शब्द काहीतरी पुटपुटते
पण तुला समोरी पाहुनच माझं, जस सकाळीच उठुन
पाहिलतर धुक्याने सार गाव झाकुन जावं
तसच  होतं, मग त्या दवात मी पुर्ण भिजलेला असतो.

एकदा तुला एकांतात भेटुन तुझ्याशी बोलण्याचा
प्लॅन ही केलेला,
पण त्याच दिवशी शाळेत खोड्या करतो
म्हणुन सरांनी कान धरून  तुझ्या समोरून  घरी नेलेला.

तुझा वाढदिवस म्हणुन मी तुला
एक झेंडूच फुल दिलेलं,
वाटलं त्याचा वास हुंगत तु वेणीत माळशील, पण तु कचऱ्याच्या डब्यात टाकुन दिलं,
मग सुकलेल्या त्या फुलावाणी  मी ही सुकत गेलो.

तरी ही चोरून चोरून तुला पाहायचो
प्रेमात तुझ्या पडलेला मी
माझी आहेस तु म्हणुन एखादं पत्र लिहुन काढायचो,
पण पत्रांना उत्तर देईल की नाही
याच घोळात पत्र मात्र खिशातच ठेवायचो.