प्रेमभंग

Started by Asu@16, September 11, 2017, 11:58:57 AM

Previous topic - Next topic

Asu@16

        प्रेमभंग

वादळी वाऱ्यात पेटल्या
धुंद झाल्या भावना
दो देहांच्या नात्यांमध्ये
राहिला काही भाव ना

घर बांधले वाऱ्यावरती
काटे पेरले अंगणा
रक्ताळले पाय तुझे
नको जाऊस थांब ना !

फुले इथे वेचलेली           
काटे बोचति मन्मना     
जाहल्या जखमा तुला         
भोगतो मी वेदना         

प्रेम गेले जळून               
राख उरली खंत ना         
फिनिक्स होऊनि प्रेम आपुले
येईल कधी सांग ना !       

- अरूण सु .पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Satish Ramesh taral

दारी अंगणी झोपुन उगाच काहि
तरी हरवलेल शोधत बसाव...
लुक लुक नार्या चांदण्या आणि त्यात
आपल्या पोर्णीमेचा चंद्र पाहत बसाव..
पण काय हरवलय आणी काय शोधतोय
याचा मनावर काहि थांग पत्ता नसतो...
हरवलेल प्रेम परत मीळेल म्हणून आपण
उगाच या आशेवर बसलेलो असतो....
.. कविराज सतिष तराळ 9527625684

Satish Ramesh taral

तु सोडून जातांनी मन रडल
म्हणून मन मनाशी जडलं,..
वेळ गेलि का काळ माहित
नाहि नेम अचानक काय घडल..,
जा गं जाऊन जाऊन मला सोडुन
किती दुर जाशील.
ऐक दिवस डोळे पाणावतिल तुझे
तेव्हा थोडस मला आठवणीत घेशील,..
,,कविराज सतिष तराळ ....