दिवस मंतरलेले =====

Started by santosh mansute, September 12, 2017, 11:02:41 PM

Previous topic - Next topic

santosh mansute

दिवस मंतरलेले
============
✍  लेखन :- श्री.संतोष बा मनसुटे

       अजुनही आठवते तुझी तिरकस नजर ,जी छेदायची माझ मन अन व्हायचा मी व्याकुळ तुला इतरांचे डोळे चुकवत पुन्हा पाहतांना....खरतर तुला मनमोकळेपणे मनातील घालमेल सांगण्याचा बराच खटाटोप केला होता....माझ्या  मित्रांना बनतांना पाहिलय लवगुरु अगदी जवळून ,नाना प्रकारच्या क्लुप्त्यांची रसमिसाळ नेहमीच रंगायची आमच्या रुमवर ,तुला प्रपोज करण्याच्या.....मात्र ताकाला जावून भांड लपवण्याचा प्रसंग बर्याच वेळा घडायाचा..तू दिसलीस की,पोहता न येणार्या आपल्या मित्राला जाणुन बुजून पाण्यात ढकलून त्याला पोहण शिकवण्याचा अट्टाहास करतात ना पोहण शिकलेली मंडळी,अगदी तसच .......तुझ्या समोर आणून उभ करायचे मला,मग मी ही घाबरासा होवून वेगळाच विषय काढून वेळ मारुन न्यायचो....ते प्रेम होत का आकर्षन मला नक्की सांगता येणार नाही....मात्र तुला पाहिल्याशिवाय मला राहवतच नव्हत येव्हड आठवते ...असच म्हन ना ,मी तुला पाहायच्या कारणामुळेच कधी काँलेज बुडवल नाही....दिवस मस्तच जायचा तुला पाहत....तू नाही आलीस का तुझ्या रिकाम्या बेंच कडे पाहत मन बैचन व्हायचं ,अन तुझ्या मैत्रीनी हळुच येवुन आपसात बोलायच्या ,आज तिला पाहायला पावणे येणार आहेत ....बाहेर पाण्याच्या टाकीजवळ त्यांच्या हसण्याचा आवाज यायचाच हमखास ,समजायचही ह्या भवान्या आपली खेचतायेत.... पन मन बेचैन व्हायचं.....खरचं ..... मी म्हणायचोही मनातल्या मनात, तू नको बघुस पलटुन एकदाही पन निदान काँलेजात तर ये....तुला पाहिल नाही का जनु आँक्सिजन चा तुटवडाच पडतो श्वास घेतांना....

           तुला आठवते काय तू नव्या कोर्या पुस्तकाचा बेंच वर बसुन वास घेत होती, अन मी तुझ्या मागुन येवुन भो .~~~...असा आवाज केला होता.अन तू डचकून कावरी बावरी पाहत होतीस..एकदा गम्मतच झालती ...आमच्या टवाळखोर मित्रांनी, टवाळखोर यासाठी म्हटल की इतरांच्या खोड्या काढण्यात आम्हाला खुप आवडायच अन मी ही त्यातलाच ..तर गम्मत अशी की , तू आम्हाला क्राँसिंग करुन पुढे जात होती....अन यांनी माझ्या कानात सांगितलं की ,आज जर हिने पलटून मागे पाहिल की तुझी शाळा जमली....शाळा हा शब्द आम्ही होकार म्हणून वापरत असू..का कुणास ठावूक तू जसजसी पुढे जात होती तस तसे माझ्या ह्रदयाच्या ठोक्यांनी गती घेतली होती,तुझ्या चालीचा वेग वाढला अन माझ्या हार्ट बिट्स चा सुद्धा..तू चालता चालता थबकलीस,सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळल्या,क्रिकेटची मँच बरोबरीत सुटावी अशीच अवस्था वाटावी ती..तु थबकुन खाली बसली,हळुच पायातल्या सँडलमध्ये  रुतलेला खळा काढत मागे तिरकस पणे कटाक्ष टाकला..तो खळा रुतला होता की नाही मला माहित नाही मात्र तू वळून पाहिलीस ना तेंव्हा जग जिंकल्याचा आनंद माझ्या चेहर्यावर तरळल्याचा मला सांगितल होत माझ्या मित्रांनी...फँशन डे ला  तू साडी घालून आली होतीस ना तेंव्हा तुझी इन्ट्री होताच सर्व जन माझ्याकडे टक लावून बघत होते......मी खिर खाल्ली असेल तर बुड बुड घागरीतल्या मांजरेकडे बाकीच्या प्राण्यांनी लावावेत ना अगदी  तसेच...
        अजुनही मनाच्या कुठल्यातरी गाभार्यात चुकुन एखादी लकेर उठतेच तुझ्या आठवनींची....तुला मनातली घालमेल सांगू शकलो नाही येव्हडचं....तू नेहमीच म्हणायची एकदा का काँलेज संपल का कोण कुठ असणार अन कोण कुठं...आम्ही टवाळणी करून विषय बदलून न्यायचो...आता कळतेय हे जग खुप मोठे आहे ....अजुनही गणवेशातली पोरं पाहिले का हळुच मन हुरहुळते अन मंत्रमुग्ध होते....त्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवनीत......

  ~~~काल्पनिक~~~~

     ✍ लेखन :- श्री.संतोष बा.मनसुटे
  (प्रा.शि.)
       रोहणा ता.खामगांव जि.बुलडाणा
📲9099464668
Santosh Mansute