गणपती बाप्पा

Started by Asu@16, September 17, 2017, 05:07:57 PM

Previous topic - Next topic

Asu@16

            गणपती बाप्पा

आपला आपणच गणपती असतो
सुखकर्ता - दुःखहर्ता कुणी नसतो
आयुष्याच्या मखरात आपणच बसतो
स्वतः सोडून इतरांना हसतो

मुहमें राम बगल में छुरी
मातीच्या चुली घरोघरी
पाप करून पुजता देवाला
कशाला देव घेईल हवाला ?

पुण्याची पाटी तशीच कोरी
पापपुण्याची गणना देव करी
देव फक्त बघत असतो
इकडे तिकडे सर्वत्र भासतो

तराजू त्याच्या हातात असतो
काटा आपणच झुकवित असतो
कर्म आपल्या हातात असते
तरीही देवाला भीक मागत असतो

निसर्ग फक्त रूसला आहे
माणूस मात्र बदलला आहे
मात करण्याच्या भ्रमात आहे
लाथ खाऊनही गर्वात आहे

बाजार मांडतो तुझ्या मंडपी
रात्र जागवी गुंड मद्यपी
माहात्म्य तुझे उंचीत मोजतो
ढोल ताशा पुढे वाजतो

कान फुटले, डोळे मिटले
संस्कृती झाली भ्रष्ट
हाती घ्या परशु आता
संहार कराया दुष्ट

बाप्पा मोरया, बाप्पा मोरया
पुन्हा पुन्हा पडतो पाया
नको येवूस गणपतीराया
तुमच्या पायी माणूस वाया

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita