वेगळेपण

Started by शिवाजी सांगळे, September 17, 2017, 06:41:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वेगळेपण

चेहऱ्यामागचे चेहरे
वेळोवेळी आपोआपच
उलगडले जातात,
काही आपसूक तर
काही हेतूपुरस्कर
आपल्यातली
दुसरी बाजू दाखवतात,
प्रत्येकात वेगवेगळे
चांगले वाईट
स्वभाव दोष असतात,
प्रसंगानुसार
ते प्रकट होतात,
त्या प्रकटीकरणावेळी
शिक्षण, संस्कार
फार मोलाचा वाटा उचलतात
आणि व्यक्तीचे वेगळेपण
अधोरेखित होते,
कधी चांगले तर कधी वाईट.

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९