अजूनही

Started by Asu@16, September 20, 2017, 06:06:55 PM

Previous topic - Next topic

Asu@16

     अजूनही

उठा उठा ताईबाई
जग सारे जागे होई
पाऊस परी सरला नाही,
अजूनही.
तुम्हा आज सुट्टी नाही
शाळेसाठी करा घाई
डोळ्यामध्ये झोप राही,
अजूनही.
स्वयंपाकाच्या आल्या बाई
लवकर लवकर त्यांना घाई
न्हाणीमध्ये तुम्ही नाही,
अजूनही.
टाॅप घाला, वर टाई
डब्यामध्ये नानकटाई
दप्तर तुम्ही भरले नाही,
अजूनही.
आेरडते नेहमीच आई
सगळ्याचीच तिला घाई
बस कशी आली नाही,
अजूनही.
नको शाळा नको घाई
आईच्या मी कुशीत राही
त्या दिवसाची वाट पाही,
अजूनही.
थकला थकला जीव बाई
करुनिया घाई घाई
लहानाची ना मोठी होई,
अजूनही.

- अरूण सु.पाटील 

https://www.facebook.com/AsuChyaKavita