आम्हीही भ्रष्ट

Started by शिवाजी सांगळे, September 22, 2017, 04:53:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आम्हीही भ्रष्ट

लढ एकटा इथे कुणी कुणाचा नाही
कर कष्ट तू भरवसा नवसाचा नाही

देती दाखले सर्व कथा पुराणातल्या
मानला देव तर कुणा एकाचा नाही

सांगतो आपण श्वास माझा जगाला
अधिकारही तो त्यावर तुमचा नाही

पाहऱ्यास जेव्हां येथे चोरास नेमले
प्रश्न सावाच्या त्या दरोड्याचा नाही

यंत्रणाच भ्रष्ट कुठे तशी कमी आहे
आम्हीही भ्रष्ट रोग ईलाजाचा नाही

असुदे छत्री ती प्रवासात सोबतीला
काहीच अंदाज या पावसाचा नाही

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९