मूबळुई लोकल

Started by sharad Halde, September 29, 2017, 01:05:31 PM

Previous topic - Next topic

sharad Halde

मूंबई लोकल लोकल
पोटासाठी जीवाची धावपळ
चढा रे पटापट
नाय तर सूटल लोकल

जरी येईल दूसरी
तरी हाती नाही वेळ
जरा करा रे अॅडजस्ट
नाय तर सूटल लोकल

भेटली चौथी सीट
तर नशीब आपल
थोड घ्यारे सरकून
नाय तर सूटल लोकल

जीव टांगला गेटवर
भान घरचं विसरल
द्या रे थोडा धक्का
नाय तर सूटल लोकल

उतरा पटापट
थांबली लोकल
जरा करा रे घाई
नाय तर सूटल लोकल



शरद हळदे