वेळ

Started by yash_yawalkar, October 05, 2017, 01:36:11 AM

Previous topic - Next topic

yash_yawalkar

   



आजकाल लोक्कांना वेळ नाही म्हणे
लाईफ काय आपली तर खेळ नाही म्हणे 
मुलगा कधी मोठा बापाला नाही कळत 
जो पर्यंत बाबा बाबा म्हणत तो मागे नाही पळत 
आईच काळीज सदैव अंधारातच असतं 
पण तिचाच प्रेमावर अक्ख जग अवलंबून असतं 
रडण्यापेक्षा लोक्कांना 
हसणं महत्वाचं झालंय 
काही पण विचारलं 
तर म्हणे आमचं मस्त चाललंय 
डोक्यात आणि मनात 
विचार असतात वेगळे 
पण बॉस एकचं म्हणतो 
काम करा रे सगळे
लहानपण कधी हरवलं 
हेच नाही कळत   
मोठं झालो हे
सत्य नाही आवरत 
आपला विचार सोडून 
लोक्कांचा जास्त करतो 
आणि स्वतःला भेटायला 
सतत तडफडतो 
प्रेम म्हणे खेळ नाही
असे सगळे बसले सांगत 
द्यायला तुम्हाला वेळ नाही 
जारो कोणी मागत 
संगती मुळे कोणी व्यसनी नाही होत 
हा सगळा असतो भावनांना मधला खोटं 
छोट्या छोट्या गोष्टीनं मुळे 
झाला घोळ मोठा 
काही नाही होत 
याचा संपेना तोटा 
आयुष्य जगणे हे नाही सोप
असावी लागतात त्यात संबंधांची रोपं
शब्दांचे चालवतो आपण मोठी मोठी बाणे 
त्यामुळे होतात विश्वासाचे छोटे छोटे कणे 
आजकाल लोक्कांना वेळ नाही म्हणे 
लाईफ काय आपली तर खेळ नाही म्हणे 
                 
- यश संजयराव यावलकर