साथीदार

Started by कदम, October 10, 2017, 02:01:36 PM

Previous topic - Next topic

कदम

बाभळ काटेरी
बांधावर येते
नकोस्या काट्याने
साथीदार होते

देते कधी घाव
होते कधी छाया
कठोर मनाने
साक्षीदार होते

बाभळीचा फांटा
कुंपणही होतो
कधी तीचा काटा
अडचण होतो

बांधापासून ती
चुलीपाशी येते
सरणावरही
साथीदार होते

Abhishek Dhavale