अस्तित्व

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 14, 2017, 07:01:06 AM

Previous topic - Next topic
तुझ्या नावातचं माझं
अस्तित्व शोधतो मी
कुठं दिसणार नाही तरीही
तुझ्या हृदयात जागा शोधतो मी

जागे पणीच तुझ्या
स्वप्नात रोज हरवतो मी
चालता चालता मध्येच
तुला सावलीत शोधतो मी

हृदयाची दारे निखळली आता पुन्हा
त्या उंबऱ्यावर तुला पाहतो मी
पुन्हा येऊनी तू उंबरा ओलांडशील
म्हणून पुन्हा मखमली गालिचा होतो मी

नाजूक त्या स्पर्शात तुझ्या
पुन्हा ते आपलं पण पाहतो मी
लाल बुंद त्या हातांचे घराच्या
भिंती वर ठशे शोधतो मी

पुन्हा त्या पाकळ्यांच्या
मोहक नक्षीत आपलं प्रेम शोधतो मी
अन नकळत कधी पुन्हा
त्या खोट्या स्वप्नात हरतो मी


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]