दमडीची ती आपुलकी

Started by abhishek panchal, October 14, 2017, 11:23:55 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

दमडीची ती आपुलकी , कितपत पुरणार होती
खऱ्या वेळी जात दाखवून , ती मरणारच होती
कुंपन तोडून ओढीचे , खोटी वाट धरणार होती
पाठ दाखवत मला , दूर ती पळणारच होती
आभासी ते प्रेम , सवय म्हणून उरणार होतं
खरचटन्याच्या बहान्याने , केव्हातरी जळणारच होतं
धाग्यावरचं आपलं नातं , सुतावरती तरणार होतं
ते सूत म्हणजे तुझी बाजू , केव्हातरी कळणारच होतं


अभिषेक पांचाळ , पुणे
(९०२८८७५९५८))

Shrikant R. Deshmane

धाग्यावरचं आपलं नातं , सुतावरती तरणार होतं
ते सूत म्हणजे तुझी बाजू , केव्हातरी कळणारच होतं

khup chan abhishekji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]