थोडं तरी आठव आपलं प्रेम

Started by Shrikant R. Deshmane, October 19, 2017, 07:50:24 AM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

आता प्रेम सारेच करताना दिसतात, पण कधी कधी सर्वाना प्रेम मिळतच
असं नाही, काहींना ते मिळूनही अपूर्ण राहतं अश्याच एका प्रसंगावर आधारित ही पुढील कविता...

"थोडं तरी आठव आपलं प्रेम,
आता ज्यात नाही राहीलाय काहीच नेम।

सुरवातीला तुला पाहून नजर हटेना,
मी प्रेमात पडलो माझं मलाच पटेना।

तुझ्या भुतकाळाला काही कारणास्तव नाकारलं,
अन प्रेमासाठी मी तुला भूतकाळा सकट स्वीकारलं।

सगळं विसरायला तू दिलास होकार,
अन आपलं प्रेम घेऊ लागल नवा आकार।

Comfrtable नाही म्हणून मला केलस दूर,
तेव्हाच लागलं नात्याला ग्राहणाचा पूर।

वर्षोनुवर्षे आपल नातं दूर जात राहीलं,
मी मात्र आठवणींमध्ये तुला खूप शोधून पाहिलं।

अचानक एक दिवस आलो एकमेकांसमोर,
नात्यालाही मिळाला एक चान्स once more।

बहरत गेल नातं खुलु लागलं पुन्हा,
नात्यात नको होता मला कुठलाच गुन्हा।

मोठे होत गेलो झाली जगाची जाणीव,
भेटण्यासाठी जॉब मुळे मिळेना वेळ हीच होती उणीव।

नातं दुरावलं पुन्हा विस्कटलं,
सुरळीत होण्यासाठी मी जुनं सगळं उस्कटलं।

तुझं माझं प्रेम होतं याची सुटतं गेली आशा,
दरवेळी तुटत गेली इच्छा झाली सगळीच निराशा।

तू नेहमी msg करायची अन माझे त्यावर थोडेच reply,
प्रेमाच्या वाटेवर मी एकटाच चालतोय कसं करु solution apply?

कधीतरीच भेटणं पण नाही होत बोलणं कुठले,
खरच सांग मला आपलं नातं काय या प्रश्नांचे वादळ उठले।

तुझी शेवट परेंत साथ असेल असा होता माझा थाट,
आठवणींसोबत जगतोय अजुन पण तुझीच बघतोय वाट।

तुझीच बघतोय वाट....."

                                       श्रीकांत रा. देशमाने
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]