दीपोत्सव

Started by vijaya kelkar, October 21, 2017, 04:09:11 PM

Previous topic - Next topic

vijaya kelkar

     दीपोत्सव
उत्सव दिपकांचा दिपोत्सवपर्व
उजळल्या दशदिशा प्रकाशाचा सर्ग
उतरल्या काही आकाशीच्या तारका
उमलल्या त्या फुलझडीतून कलिका
उधाण आनंदाचे वर्षता स्नेह नीर
उत्साह, उमंग, उल्हास याने भरला ऊर
उपकार करता ,नको वाच्यता - घ्या ही शपथ
उचला पाऊल,चाला वाटचाल ,हाच पथ
उभार मरगळल्या जीवा देई प्रकाश
उपरती हो ऐसी, झटका कुरीती सावकाश
उज्वल भविष्य, उत्तम आरोग्य लाभो
उजाडता नव दिन,उत्कर्षाचे वारे वाहो
उदरभरण्या हे अनेकविध जिन्नस
उपहार द्या-घ्या करत हास परिहास
****शुभ दीपावली****
    विजया केळकर ____