कथा (भाग - १)

Started by Ravi Padekar, October 22, 2017, 05:38:21 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

       रात्रीची शेवटची लोकल CST स्टेशन वरून अंबरनाथ ला जाणारी घाईघाईत येउन पकडली. नशीब ही जर सुटली असती तर ऑफिस मध्येच झोपावं लागलं असत. कामावरून पहिल्यांदाच एवढ्या late झालं होतं, आणि त्यात मार्च ending. टार्गेट तर पूर्ण झालेच पाहिजे. तसं घरी आईला कळवलच होत यायला थोडा उशीरच होईल म्हणून चिंतेच तसं काही कारण नव्हतं. ट्रेन मध्ये सहसा कुणीच नव्हतं. मी सोडून दोन जणच मागे कुठे तरी खिडकीचे कोपरे पकडून बसले  होते. मी आपला एकटाच कानात इअरफ़ोन्स घालून दरवाजा जवळच उभा होतो. पुढील स्टेशन आल्यावर दोन जण  आमच्या डब्यात चढले आणि दोघे जण उतरले आता गाडीत ते दोघे सोडून कुणीच नव्हते. आणि ते पण गेटजवळ उभे राहिले, पण त्या दोघांच्या वर्तवणुकीमुळे मी आतमध्ये जाऊन सीटवर बसलो. उगीच कशाला नस्त्याला कारण! ते माझ्याकडे पाहून एकमेकांना डोळ्यांनी खुणवत होते, पण थोड्या वेळाने ते दोघे गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. मी पण जास्त लक्ष दिले नाही. त्यांनी माझ्या कानातले हेडफोन्स झटकले, आणि मला डायरेक्ट मारायला सुरुवात केली. मारण्याच कारण तर काही कळालं नाही. पण काहीतरी लुटायच्या भावनेने त्यांनी माझ्यावर प्रतिकार केला. मी पण त्यांना प्रतिकार करण्याचं प्रयत्न करत होतो. तर दुसऱ्यांनी माझ्या जवळील मोबाइल हिसकावला. तसच मी त्याला ढकलून दिले. पण दुसऱ्याने येऊन माझा गळा पकडला. माझी प्रतिकार करण्याची क्षमता आता कमी पडू लागली. तोंडांतून शब्द फुटणे देखील कठीण झाले होते. कधी एकदाचे पुढचं स्टेशन येतंय अस झालं होतं. तेवढ्यात मागून एका स्त्रीचा आवाज आला. ती मोठ्याने किंचाळली. "ये...." मी पण मागे वळून पाहिलं तर ती हिंसक चेहऱ्याने त्यांच्या कडे पाहत होती. तिच्या खांद्यावर बॅग होती. पोपटी कलर ची ओढणी आणि यलो कलरचा तिचा ड्रेस होता.   आणि तिच्या हातात एक लोखंडी पाईपाचा रॉड होता. त्या दोघांनी पण तिच्यावर आवाज चढवला. मी पण त्यांच्या तावडीतून आता सैल झालो होतो. आणि मी त्या दोघांना ढकलून एका साईडला झालो. पुढील स्टेशन आल्याबरोबरच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यांना पुढे काही करता आलं नाही. असा कधी प्रसंग माझ्यावर या आधी ओढवला नव्हता. पण हे दृश्य भयानक होते. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या मुलीकडे पाहिले. ती माझ्या समोरच्याच सीटवर येऊन बसली. तिच्या त्या एकंदरीत स्वभावामुळे ती कामावरूनच घरी जात असल्याच जाणवलं. दोघेही एक क्षण शांतच होतो. ती शांत झाल्यावर तीच रूप आता छान दिसत होतं. तशी दिसायला एवढी भारी नव्हती पण एवढी पण वाईट नव्हती. सावळीच होती. कपाळावर एक छानशी बारीक टिकली होती. आणि बरोबर ओठांच्या खाली हनुवटीवर तीळ होता. त्यामुळे ती छान दिसत होती. तिने तिच्या बॅगेतून बॉटल काढली आणि माझ्यापुढे केली. " हे घे.." तिने म्हटलं. मी तिच्याकडे पाहून फक्त नकोच म्हटलं. "अरे घे पैशे नाही घेणार" एवढं बोलून बॉटल पुढे केली. आता एवढं आग्रह करतेय तर मी पण बॉटल घेतली आणि एकाच घोटत बॉटल खाली केली. " बघितलस एवढा घसा कोरडा होता तरीही नको म्हणतोच" तिने हातातली बॉटल घेऊन बॅगेत ठेवली. मी पण आपलं thanks म्हणून आपली साईट क्लिअर केली. पण इकडे तर सर्व उलट झालं होतं. या मुलीच्या किंचाळीने ते दोघं पळून गेले. तसं माझी पण प्रतिकार क्षमता कमीच पडत होती. कुणाच्या तरी साथीची गरज पडत होती. मग ती मुलगी असो की मुलगा. पण मुलगी असून पण अशी धाडसी. मी तिला पुन्हा 'thanks' म्हटलं," अरे बस ना, आता किती वेळा" तिनेच म्हटलं. तिने तिच्या केसांची क्लिप काढून केस मोकळे केले. मी कधी खिडकीत तर कधी तिच्याकडे पाहत होतो. तिने केसांना पुन्हा आपल्या हाताने बांधून त्यावर क्लिप चढवली." काय नाव तुझं" तिने मला विचारलं." आकाश" मी पण नाव सांगून मोकळा झालो. आणि मी पण तिला नाव विचारले. तिने पण सांगितले." "भूमी"
"रोज याच वेळेवर घरी जातो का" तिने मला विचारलं.
"नाही.. सध्या काम खूप वाढलं आहे, म्हणून उशीर होतो.
"ओके, बरं सांभाळून येत जा... तिने पण काळजीनेच सांगितले.
"बरं तू काय करतेस?
"मी...
" सॉरी मी निघते, माझं स्टेशन आलं. आणि ती देखील bye करून निघून गेली.
मी तर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पाहत होतो. पटकन काय बोलावं सुचत नव्हतं. तिचा नंबर घ्यावास वाटत होता पण त्या हरामखोरांनी माझा मोबाईल पण चोरला होता आणि गाडीही सुरू झाली. खिडकीमधून एक एक दृश्य पाहून सारखा सारखा झालेला प्रसंग डोळ्यासमोर यायचा. मुळात त्या मुलीचं रूप सारख डोळ्यासमोर घुटमळत होत. मी आपला एकटक खिडकीकडेच पाहत राहिलो...
क्रमशः....