कथा (भाग - २)

Started by Ravi Padekar, October 22, 2017, 05:39:35 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

कथा - भाग २
       
         घराचं दार ठोठावलं तसं आईने दार उघडलं," खूपच उशीर झाला रे बाळा" आईने म्हटले."हो आता दोन तीन दिवस उशीरच होईल." एवढं बोलून मी फ्रेश होण्यासाठी आत गेलो. एवढ्या रात्रीच तरी हा प्रसंग सांगणं बरोबर वाटत नव्हतं. परत आईलाच काळजी लागायची. दुसऱ्या दिवशी वेळेवर ऑफिसमध्ये पोहचलो. कामाच्या गडबडीत कालचा प्रसंग कुणालाच सांगितला नाही. दिवसभर मोबाईल नसल्याने कित्येक contact बंद पडले. मयूरने च विचारले," काय रे मोबाईल कुठेय?" आता खोट बोलणं पण आपल्याला जमतं नाही, झालेला सर्व प्रसंग मी मित्राला सांगितला." अरे पण तुला जास्त मारलं नाही ना"
"नाही रे..."
"घरी सांगितलं आहे का?"
"नाही...
"अरे घरी तरी कळवायचं"...मयूर ने म्हटले
"कसं कळवणार आधीच एक महिना पण झाला नव्हता मोबाईल घेऊन, साल्याना काय जातंय चोरायला, इथं तीस दिवस घासावी लागते तेव्हा कुठं mobile घ्यायला जमतोय, पण यांचं काय तीस सेकंद मध्ये मोबाईल गायब करतात, याना कष्ट करायचं माहीत नाही का.
"चिल्ल यार... बरं पोलीस complaint तरी केली का?
"हो आता येतानाच करून आलोय"
"बरं कोण मुलगी होती यार ती?
"माहीत नाही"
"Married होती का?
"नाही रे...
"अरे काहीतरी नाव नंबर तरी घ्यायचा?
"कशाला अशा वेळी नाही सुचलं पटकन, आणि कशाला उगीच तिला वाटायचं की फ्लर्ट करतोय म्हणून...
"जाऊदे नाव तरी सांग...
"भूमी"... मयूर तर प्रश्नावर प्रश्न विचारून मला तर भंडावून सोडत होता.
आता परत कधी भेटणार नाही म्हणून मी पण  त्या गोष्टीचा विचार करणं सोडून दिलं. तरीपण मयूर मात्र तिला फेसबुक वरून शोधू लागला. 'भूमी' नावाच्या असंख्य मुली त्यावर show होत होत्या. पण तो सर्व मुलींचे फोटो दाखवून माझ्याकडून ओळख पटवून घेत होता. पण ती भूमी काही सापडली नाही. आम्ही तर विचार करणं सोडून दिलं. कामच खूप होत त्या मुळे मी पण आता मयूर कडे एवढं लक्ष दिलं नाही. आज पण उशीर होणार म्हटल्यावर कामावर जास्त जोर नाही दिला आणि काम संपल्यावर आम्ही दोघे निघालो
"बरं 'आकाश' सांभाळून जा" आणि काही प्रोब्लेम असेल तर कळव. मयूर ने पण एक दिलासा देऊन तो त्याच्या मार्गावर निघाला. मी पुन्हा स्टेशन वर आलो. मनात एक भीतीच होती. ट्रेन ने प्रवास करणं पण आता नकोसं वाटत होतं. पण त्या शिवाय पर्याय ही नव्हता. पण या वेळी नऊ दहा जण तर होतेच म्हणून भीतीच काही टेंशन नव्हतं. पण तरीही मनात एक सल लागत होती. कुणावरतीच आता विश्वास बसत नव्हता. ट्रेन आली आणि मी जिथे कमी लोक होते अशा डब्याकडे वळलो आणि मागे जाऊन बसलो.
" एक दोन स्टेशन गेल्यावर मला झोप यायला लागली. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेमुळे आणि एवढ्या रात्र भर जाग राहण्याची सवय नसल्यामुळे डोळा लागत होता. पण मी स्वतःला कंट्रोल केलं. आणि समोरच्याच एक दोन सीट सोडून मला भूमी सारखी मुलगी दिसली. पण ती विरुद्ध दिशेला तोंड करून बसल्यामुळे ओळखणं शक्य नव्हतं. पण तरीही मी भूमी म्हणून हाक मारली. तिने ही मागे वळून पाहिल्यावर माझी खात्री पटली. ती भूमीच होती. ती हसली आणि म्हणाली, " काय मग आज परत." माझ्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं आणि मी ही म्हटलं, हो मग...
ती आता समोरच्या सीट वर आली.
" तुला आज उशीर झाला वाटत" मी आपलं सहज भूमीला विचारलं
" नाही तर.. माझा तर नेहमीचाच time आहे."
" कसं जमत एवढ्या रात्रीच....
"काय करणार पोटातल्या खडगी साठी माणूस लाचार पण बनतो, तुला जमत तसंच"
मी आपला दोन मिनिटं शांतच होतो. ती मात्र गाणी ऐकत वेळ घालवत होती. बोलावसं तर खूप वाटत होतं पण डायरेक्ट सर्व गोष्टी विचारनं बरं वाटत नव्हतं. हळूहळू गप्पा गोष्टीला सुरवात झाली. गाव, कुटुंब, घर, मित्र सर्व गोष्टी share होत गेल्या. दोन दिवसांची मैत्री पण आता दोन वर्षासारखी वाटू लागली.  ती निघताना मीच तिच्याकडे नंबर मागितला. पण तिनेही कसलाच संकोच न करता नंबर दिला. हळूहळू आमची मैत्री वाढू लागली. नेहमी ऑफिस वरून लवकर जरी सुटलो तरी  तिच्यासाठी त्याच ठरलेल्या ट्रेन ने यायचं. ट्रेन आली की ती आणि मी गप्पा मारत यायचो. एकमेकांच्या आवडी निवडी. स्वभाव सर्व काही जाणून घेऊ लागलो. तिला पण माझी सवय झाली असावी. मी तिला मोबाईल वरून मेसेज सेंड केला पण रिप्लाय काही आला नाही. बहुतेक कामात असेल. पुन्हा दोन तीन मेसेज सेंड करून सुद्धा एकही रिप्लाय तिचा आला नाही. दुसऱ्या दिवशी ती मला पुन्हा ट्रेन मध्ये भेटली. त्यावेळी मी तिला विचारलं, " कालपासून तुला 10 मेसेज केले. तुझा एक पण मेसेज नाही आला.
तिने बॅगेत हात टाकुन काहीतरी चाचपडत बसली, आणि अचानक म्हणाली " अरे मोबाईल repair करायला दिला आहे" डिस्प्ले चा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे."
"अरे पण भूमी तू मला एकदा तरी सांगायला हवं होतं." दोन तीन वेळा कॉल पण केले तरी तुझं तसंच.
"अरे पण भांडू नकोस ना... मी मुद्दामून थोडी केलं."
तिच स्टेशन आता जवळ आलं. "जाऊदे तुला वाटत ना मीच चुकले म्हणून बरं बाबा "Sorry"
माझ्यातर मनात च चाललं होतं. हिच्यासाठी एवढा बैचेन झालो होतो आणि हिला माझं काहीच नाही वाटत, आता मला पण तिची काळजी वाटायला लागली होती. अशी का वागते ही माझ्यासोबत, पण मी पण का एवढा negative विचार करतोय. तिने म्हटलं ना sorry मग ठीक आहे ना. मी आपल्या मनालाच सावरत होतो. तो पर्यंत ती स्टेशन वरून उतरली होती... मी पुन्हा तिच्याकडे त्याच आशेने तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत होतो. वाटलं आता तरी एकदा वळून बघेल. गाडी ही सुरू झाली आणि शेवटी तिने ही वळून पाहिलं आणि एक गोड स्मितहास्य देऊन निघून गेली...
क्रमशः...