कथा (भाग - ५)

Started by Ravi Padekar, October 24, 2017, 12:04:41 AM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

कथा - भाग ५

     तिने मला खूप गोष्टी share केल्या होत्या. म्हणून मला तिच्या घरचा पत्ता पण ठाऊक होता. ती भांडुप मधल्या टेंभीपाड्यातल्या वस्ती मध्ये राहायल्या होती. पण हा पण address जर चुकीचा निघाला तर...
पण तरीही मी जायचं ठरवलं. टेंभिपाड्यातल्या वस्तीमध्ये आल्या नंतर तीच घर शोधन कठीणच होत. एवढ्या दुपारच्या वेळेला अंगातून घामाच्या धारेने शर्ट ओलं झालं होतं. काहीही करून तीच घर तर शोधायचंच होत. पण तिच्या घरच्यांनी विचारलं तर काय सांगायचं काहीच डोक्यात नव्हतं. तरीही तिने मला फसवलं याचा जाब तर विचारायचाचं होता. खूप फिरलो तरीही तीच घर एवढ्या मोठ्या वस्तीमध्ये सापडणं मुश्किल होत. शेवटी तिथल्याच एक गृहस्थाला विचारले, " भूमी शितप कुठे राहते सांगू शकाल का?" त्याने ही माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले, "नक्की तुम्हाला कुणाला भेटायचं आहे? " भाऊ शितप" यांना भेटायचं आहे का? त्यांनी मला विचारले.
'भाऊ शितप' बहुतेक हे भूमीचे वडील असतील अस मनात आल्याबरोबर मी हो म्हटलं.
त्यांनी मला हातानेच दिशा दाखवून सांगितले. पुढे गेल्यानंतर एक शाखा लागेल त्याच्या मागेच ते राहतात. एकदाच मिळालं घर म्हणून जरा निश्वास सोडला आणि त्या दिशेने चालू लागलो. घराजवळ आल्याबरोबर  मी बाहेरूनच दार ठोठावले.
"कोण आहे? आतूनच आवाज आला
" काका मी... एवढंच बोलून मी थांबलो.
काका बाहेर आल्यानंतर त्यांनी मला आत बोलावले. मी ही जाऊन सोफ्यावर बसलो. दमलो असल्या कारणाने तहानही खूप लागली होती. तसंच ग्लास भरून पाणी समोर आलं. काकी ग्लास घेऊन बाहेर आल्या होत्या. मी ग्लास घेऊन घटाघट पाणी पिऊन टाकले. मीच सुरवात केली. काका मी भूमीच्या ऑफिस मधून आलो आहे. मी मुद्दामून अशीच सुरवात केली. तसंच त्या काका आणि काकींनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांनी मला नाव गाव सर्व माहिती विचारली. मी पण आपल्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून मोकळा झालो. पण अजून भूमी कुठे घरात दिसत नव्हती. कुठे बाहेर तर गेली नसेल. मीच काकांना विचारलं,
"भूमी कुठे बाहेर गेली आहे का?
तसंच काकी लगेच आत गेल्या. बहुतेक तिला बोलवायला तर नाही गेल्या?
"भूमी तुला नेहमी भेटते ना लोकल मध्ये." भूमीच्या वडिलांनी मला विचारले.
"हो... ऑफिस सुटलं की आम्ही दोघे सोबतच येतो ना" एवढ्या रात्रीच पण एकटीने येन बरोबर नाही वाटत. म्हणून मी असतो तिच्या सोबत." मी आपलं असच काहीतरी त्यांना सांगत होत.
ते दोन मिनिटं शांतच होते. मला भूमीला एकदा तरी पहायचं होत. तिला भेटायचं होत. निदान भेटून तरी जावं. म्हणून मीच पुन्हा मुद्दामून विचारले, " भूमी आहे का घरी?"
काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, " अरे बाळा...
ते थोडावेळ थांबले आणि धीर एकवटून त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, "भूमीला जाऊन चार वर्षे झालेत. ती या जगात नाही आहे.
हे ऐकूनच माझ्या अंगाचा थरकाप उडाला. पुन्हा घाम फुटू लागला. डावा पाय देखील थरथर कापत होता.
"काय....?
"हो भूमी जाऊन चार वर्षे झाली. माझी एकुलती एक मुलगी. इन्फोसिस कंपनी मध्ये इव्हेन्ट मॅनेजर होती. इव्हेंटच काम देखील खूप उशीरापर्यंत चालायचं. त्यामुळे तिला घरी यायला कधी कधी उशीर व्हायचा. त्या दिवशी पण ती शेवटची लोकल पकडून घरी येण्यासाठी निघाली होती. पण त्या रात्री काही नराधम तिच्या डब्यात शिरले. त्यांनी त्या एकट्या मुलीचा आणि रात्रीच्या अशा भयाण संधीचा फायदा करून घेतला. नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकले. पोलिसांच्या मदतीने ते पकडले गेले खरे. पण हरामखोर आता जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. फाशी तरी व्हायला हवी होती. त्यांनी चष्मा काढून ओलावलेले डोळे पुसले. पण एकटी मुलगी जबाबदारी नसून यांना संधी वाटते." तू चौथा मुलगा आहेस जो या घरापर्यंत आला आहे. ती कुणालाच त्रास देत नाही फक्त रात्रीच्या भयाण प्रसंगातून कुणावर प्रसंग ओढवला तर त्यांना साथ देते. तुझ्यावर पण असाच कुठला तरी प्रसंग ओढवला असणार. म्हणून ती फक्त तुला साथ देत होती." काका बोलून मोकळे झाले.
मला काय बोलावे काहीच सुचत नव्हतं. म्हणजे तिने सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या होत्या. तिने दिलेला नंबर, ऑफिसचा address पण खरा होता. फक्त एवढच की हा नंबर आता दुसरा कुणीतरी use करत होता. सर्व गोष्टी आता क्लिअर झाल्या होत्या. पण एवढे दिवस जे मी प्रेम समजतं होतो. त्याच एक क्षण स्वप्नात उतरलं होत. जिच्या सोबत एवढे दिवस बोलत होतो तीच अस्तिव देखील नव्हतं. फक्त एक आधार, सोबत म्हणून पाठीशी होती.मी पण तिथून जाण्यासाठी निघालो. काकांनी मला सांगितलं होतं.
"एकटी मुलगी कधीच संधी नसते, आपली जबाबदारी समजावी"
भूमी बद्दल अचानक असं ऐकून एक धक्काच बसला होता. डोळे पाणावले होते. पण तिने माणुसकी काय असते दाखवून पुन्हा जगायला शिकवलं होत. मला ही तिने साथ देऊन मनात एक घर केलं होतं. मी रस्त्याने एकटाच पाऊलांन मागे पाऊल टाकत जगण्याची नवीन उम्मीद घेऊन तिच्याच विचारात चालत राहिलो...

......End....!!!
- रवि पाडेकर (मुंबई)
मो. ८४५४८४३०३४.
कथा आवडल्यास नक्की Share करावी. पण नावासहित.🙏