रंग ठेपुनी तू फुलपाखरू जाणार

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 24, 2017, 06:40:23 AM

Previous topic - Next topic
थबकली पाऊले जिथं
तूझी माझी भेट होती
त्या झाडाची सावली आज ही
त्या ठिकाणी एक साक्ष होती

जिथं तू फक्त माझी मी तुझा होतो
ठेवुनी मजवर विश्वास
नेहमीचं प्रिये मला
तुझी सोबत होती खास

मांडी वरती डोकं ठेवुनी
नेहमीचं मोजले शेवटचे श्वास
सांग ना प्रिये तुला गं
का होतं नाही आता माझे भास

मन पाचोळ्यागत झाले प्रिये
जेव्हा तू न माझी राहिली
विश्वास तो होता प्रिये
तू का आता मला परकी झाली

नको करुस हेवा सौंदयाचा
रंग ठेपुनी तू फुलपाखरू जाणार
का मी पाहिलं स्वप्न ते
कधींच ना पूर्ण होणार

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील)
मो.9637040900.अहमदनगर