कातर वेळ वर्णन

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 26, 2017, 05:32:11 AM

Previous topic - Next topic
फुलांच्या पाकळ्यांना पुन्हा
त्या दवाची ओढ असते

सांज वेळ झाली आता त्या लाजळूच्या पानांना पुन्हा मिटण्याची खोड असते

किलबिल सुरू होते अन
पुन्हा पाखरांना घरटं खुणावत असते

हिरव्यागार रानाला नेहमीचं
त्या रानवाऱ्याची चाहलू असते

मंद मंद आवाज करत रान वारा येतो
त्या भ्रमराच्या स्वप्नांना नेहमीचं उंची देतो

किर्रर्र त्या रातीला नेहमीचं
काजव्यांच्या प्रकाशाची सोबत असते

चंद्र येतो आभाळी अन पुन्हा
चांदण्याची त्या भोवती रांगोळी सजते

झाडाच्या फांदीवर पक्षांचा संसार फुलतो
पिलांना मग पंखात मायेची ऊब मिळते

कातर वेळी ऋतूत कसा बदल होतो
मग काजवा उजेडाचा खेळ सुरू करतो


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर