निवृत्ती

Started by Asu@16, October 31, 2017, 03:25:10 PM

Previous topic - Next topic

Asu@16

          निवृत्ती

केली वणवण दुसऱ्यांसाठी
आता क्षणभर थांबूया
सिंहावलोकन करून गताचे
झेप पुढची घेऊया

        अनंत आकाश पुढे पसरले
        आता कुठे सुरुवात आहे
        गरूड भरारी मारण्यासाठी
        पंखातील बळ वाट पाहे

निवृत्ती ही कर्तव्याची
दुःख चिंता विसरू पाठी
धुंद स्वप्ने भविष्याची
आता जगू स्वतःसाठी

        कधी ना घेतला गजरा दारा
        कधी अनुभवला ना गंधित वारा
        गर्द गुलाबी गुलाब सुंदर
        खुणावितो तुज प्यारा प्यारा

होतो शहाणे आजपर्यंत
आता थोडे वेडे होऊ
मरण्याची इतपत वाट पाहिली
आता जगण्याचे गीत गाऊ

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita