ना कधी मी भेटलो तिला पुन्हा , ना मला ती भेटली

Started by siddheshwar vilas patankar, November 02, 2017, 06:56:27 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



जमत नव्हतं गाड्या मला

ते डोळ्यातले भाव वाचायला

सोबत जरी असली तिची

तरी भावना उमलण्याची फक्त मैत्रीची

ती भेटायची नि बोलायची

निसर्गसौंदर्यावर बरंच काही

मी फक्त कुणी बघतंय कि नाही

तेव्हढंच पाही

ती बोलत राहायची अखंड अविरत

डोळ्यात डोळे घालून

मी मात्र पुऱता त्रागा करायचो

गप्प बसायचो माश्या मारत

तिने केली प्रयत्नांची शर्थ

पण माझ्यापुढे ठरले सारेच व्यर्थ

एक सुंदर नाते मैत्रीचे मीच जपलेले

तिने मात्र एक व्हायचे स्वप्न पाहिलेले

काळाने हळूहळू समीकरणे स्पष्ट केली

समजता सारे मला , मैत्री तिथेच मेली

ना कधी मी भेटलो तिला पुन्हा

ना मला ती भेटली


सिद्धेश्वर विलास पाटणकर C   :'( :'( :'(
सिद्धेश्वर विलास पाटणकर C