प्रेम केलं होत तुझ्यावर

Started by drsaindane, November 03, 2017, 11:49:18 PM

Previous topic - Next topic

drsaindane

प्रेम केलं होत तुझ्यावर

प्रेम केलं होत तुझ्यावर,
हाच झाला माझा गुन्हा...
आठवताच तू,
काळजावर घाव बसतो गं पुन्हा पुन्हा...

प्रेम केलं होत तुझ्यावर,
हाच झाला माझा गुन्हा...
भावनांचा हा खेळ सारा,
नाही समजला तुझ्या मना...

प्रेम केलं होत तुझ्यावर,
हाच झाला माझा गुन्हा...
डोळ्यात प्रेम होतं वासना नाही,
हे सांगू किती पुन्हा पुन्हा...

प्रेम केलं होत तुझ्यावर,
हाच झाला माझा गुन्हा...
आठवणीत येऊन माझ्या,
भरलेली जखम कोरतेस कशाला तू पुन्हा...

प्रेम केलं होत तुझ्यावर,
हाच झाला माझा गुन्हा...
*पण असो काळाच्या मलमानं,
या जखमाही भरून निघतील भविष्यात पुन्हा...

शब्दरचना:- दिपक सैंदाणे, मु.पो. करणखेडे, ता.अमळनेर, जि. जळगाव, दि.२९/१०/२०१७
भ्रमणध्वनी क्र.९९७५८५४६६९

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]