भाकर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 10, 2017, 07:54:29 PM

Previous topic - Next topic
भाकर

कधी मायेच्या छायेतली
कधी पोटच्या गोळ्यासाठी जपून ठेवलेली भाकर

कधी उसनं वारी पिठाची
तर कधी मागून आणलेली भाकर

आपल्या पोटाला चिमटा घेऊन
टोपल्यात अर्धी कोर ठेवलेली भाकर

कधी घामाच्या कष्टातून मिळवलेली
तर कधी लाथाळून दिलेल्या
पेंडक्यात जपून ठेवलेली भाकर

आता मिळत नाही त्या माझ्या
माई नं रक्ताचं पाणी मिळसळून बनवलेली भाकर

आज पहा या पोटच्या गोळ्याची किमया
माय उपाशी अन तिला मिळत नाही भाकर


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर