सुरक्षा मंत्र

Started by Asu@16, November 11, 2017, 05:40:21 PM

Previous topic - Next topic

Asu@16

      सुरक्षा मंत्र


ऐक मानवा सांगतो मंत्र
जगण्याचे हे नवीन तंत्र
जीव सलामत तर स्वप्न हजार
ठेव ध्यानी  न होता बेजार
सत्य बोलणे टाकून द्यावे
गोड बोलणे तोंडी बाणावे
स्पष्ट बोलण्याची नकोच घाण
तोंडी त्यापेक्षा कुलूप छान
व्हॅट्सऍप च्या रणी लढू नये
उगाच भानगडीत पडू नये
रोष कुणाचा घेऊ नये
पोलिसां आमंत्रण देऊ नये
आपुली मते आपल्यापाशी 
बोलला तर रहाल उपाशी
कान, डोळे बंद करावे
सरळ रस्ता नापित जावे
भाग्य आपुले,जगण्या देती
आयुष्य आपुले गुंडांहाती
हवेवर ना टॅक्स घेती
श्वास देणे त्यांच्या हाती
मान अपमान गिळून घ्यावा
आणि सुटकेचा ढेकर द्यावा
चेहरा सदा आनंदी असावा
देशाचा अभिमान दिसावा
किडा मुंगीसम आयुष्य जगावे
दांडग्यांपायी चिरडून घ्यावे
चौऱ्यांशी योनीतून मुक्त व्हावे
चिरडणाऱ्यांचे उपकार मानावे
           ध्यानी ठेवा सुरक्षा मंत्र
           जगणे होईल सुरळीत यंत्र
           यंत्र चालेल दुसऱ्या हाती
           बंद करणे आपल्या माथी

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita