आहे आहे

Started by शिवाजी सांगळे, November 14, 2017, 06:27:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आहे आहे

कोण असा खरा इथे पावन आहे
दडला साऱ्यात..इथे रावण आहे

ठरलं लगीन पुढाऱ्याच्या पोरीच
सगळ्या गावास इथे जेवण आहे

यशस्वी.करूनी.....चंद्रावर वारी
शास्त्रज्ञच करतो ईथे हवन आहे

बोले कसा तो नशेतला भाबडा
पाळलाय मीच इथे श्रावण आहे

शोधता स्वतःलाच कधी एकांती
जीवाची फार इथे वणवण आहे

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९