ठेकेदार

Started by शिवाजी सांगळे, November 16, 2017, 08:23:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ठेकेदार

बलात्कार कर्ते आता....तक्रारदार झाले
अब्रु लुटणारे पहा...आता अब्रुदार झाले

वाचली असावीत तुम्ही ती काही पुस्तके
म्हणूनीच लेखणीचे....का ठेकेदार झाले

रंगीत किटक जे  रंगात अनेक विखुरलेले
काल खुर्द्यात होते आजला कलदार झाले

खाणारे खातच होते साऱ्याच व्यवस्थेला
विकूनी कंत्राटे परक्यांस...मालदार झाले

वळचणीला पोसलेले ....गावातले गुराखी
पायरीवर बसताच सारे...किल्लेदार झाले

लागली काय नशा...तयांना निवडणूकीची
परंपरेनेच पुढे कायम........सालदार झाले
© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९