नेता

Started by sharad Halde, November 17, 2017, 12:37:28 PM

Previous topic - Next topic

sharad Halde

नेता ....
नेमका कसा असतो
कसा  असतो?
सूरवातीला हात जोडत येतो
नंतर हात जोडायला लावतो
दारात येतो तेव्हा कीती आपूलकी दाखवतो...
आश्वासनांच तर त्याच्या कडे गाठोडचं असतं
तन मन धनानी सेवा करीन म्हणतो
कूठेही कमी पडणार नाही
पण निवडणूकीनंतर खर्चाचाच तपशील काढत बसतो...
केलेल्या  इनव्हेसमेंटच रिटर्न  काय?
ह्याचाच अंदाज लावत बसतो
अन्याय शोषण असूविधा
हे सारं सारं विसरून  जातो...
पण जात,धर्म,भाषा बरोबर लक्षात  राहते
तूमच्या जातीवर अन्याय  होतोय,
हे तो बरोबर लक्षात आणून  देतो
ह्यातून वेळ  मिळाला  तर फार फार,
एखादा रस्ता, पडकी भिंत  बाधून देतो..
पण तेव्हा ही तो पूर्वी  आलेला
सेवक नसतो
तर तो आता साहेब  झालेला असतो
त्याला तूमच्या समस्यांशी काही देणं घेणं नसतं
बरोबर ना नेमका असाच असतो..
                                           ना  नेता....?

की चूकलं माझं?

शरद हळदे