अधुरे स्वप्न

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 22, 2017, 06:48:01 AM

Previous topic - Next topic
धुंद या दाही दिशा
जाहल्या सुन्या सुन्या
मज का भेटल्या नाही
आठवणी जुन्या जुन्या

सुख जाहले कधी ही न
मिळणारे अधुरे स्वप्न
दुःख हे राहिले कधी ही न
पूर्ण करणारे अधुरे स्वप्न

जीवनाच्या या मूक पटलावर
शोध घेता कधी ही न मिळणारे अंतर
आस नेहमीचं असते ना
ती आज नाही तर भेटेल नंतर

अधोरेखीत करून ठेवलेले
कधी मिळत असते का उत्तर
सुगंध मिळणार नाही तरी
का देऊ मी या शरीराला अत्तर

सांज झाली जुनी तरी
का राहिलो मी ओझ्याखाली
न बळ देता उचलून धरतोय मी
खोट्या प्रेमाला दबावाखाली

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर