कोण नाही तुझ्याशिवाय माझं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 26, 2017, 07:29:10 AM

Previous topic - Next topic
दिस उलटूनी जातो,वाट तुझी  पाहतांना
रात्रही छोटी होते, स्वप्न तुझी पाहतांना

चंद्र ही दिसेनासा होतो दिस उजेडतांना
सूर्यही लाजतो,डोंगरा पल्याडून डोकतांना

धुक्यात तू दिसेनाशी होतेस,खरं सांगू
स्वतःला पाहतो तिळतीळ मरतांना

नाही सार इथंच आहे गं, तू नसतांना
अर्धमेलेला असतो गं,जीवन जगतांना

पाहिले जेव्हा तुला रस्त्यातून जातांना
जगण्याचे अर्थ कळाले तुला पाहतांना

निसटला श्वास जेव्हा तू आलीस जवळ
हृदयाची तार जुळली तू मान वळतांना

हृदयाचे ठोके वाढले,तू जवळ नसतांना
खूप छान दिसतेस तू नाक मुरडतांना

एकदा ये पुन्हा होऊन परी तू नेईन पुन्हा
त्या रंगमहालात प्रेम गीत छेडतांना

कोण नाही तुझ्या शिवाय माझं ये पुन्हा
घेऊ शेवटची भेट सरणावर मरतांना

श्वास कोंडला आहे माझा ये पहायचंय
तुला माझ्या मृत शरीरावर रडतांना

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर