तसेच तू हसत रहा

Started by Asu@16, November 26, 2017, 02:43:36 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   तसेच तू हसत रहा

आकाशातून पडतात फुले
त्याचीच होतात सुंदर मुले
स्वर्गातून आली दिव्य प्रभा
म्हणून झालो आई बाबा
असा बाळाचा जन्म झाला
जसा त्रिभुवनी आनंद झाला.
देऊ शुभेच्छा बाळाला
हात भिडोत आभाळाला
सुख दु:ख विसरून सगळे
देऊ आशिर्वाद बाळाला
सुख समृद्धी आरोग्य आयुष्य
असो त्याचे उज्ज्वल भविष्य
बाळा होऊ कसे उतराई
तुझ्यामुळे आम्ही झालो आई
नुसतेच असे म्हणत नाही
घडवू मा - बापसे सवाई
आपण सारे आज जमला,
दुग्धशर्करा योग झाला
आभार आपले मानू कशाला
प्रसंग हा असा नाशिला
बाळा, कर आयुष्याशी "दोस्ती"
आयुष्य नसते नुसतीच मस्ती
सुख दु:ख भोगून सगळे
आकाशाचे तारे हसती,
तसेच तू हसत रहा
तसेच तू हसत रहा

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Hemlatapr

खूप छान कविता....प्रेरणादायी...