परकेपणाचे अंतर

Started by amoul, February 06, 2010, 06:10:33 PM

Previous topic - Next topic

amoul

परकेपणा जसा आपल्याला इतरांकडून जाणवतो तसा तो त्यानाही कधीतरी आपल्या कडूनपण जाणवत असेल ,कारण त्याचाही पाय कधी   विश्वासाच्या  पायरीवर   ठेचाळला असणार. त्याला आपल्याकडून  असुरक्षितपणा   वाटण्याची कारणे काही अशीही असू शकतात.

कसं सांगू सार काही वाटते मनात भीती,
समोरच्या मनाची तरी कुठे असते संपूर्ण माहिती.

ज्याच्या जवळ करावी मनातली गुपीत उघडी,
तोच विस्कटतो मागून विश्वासाची घडी,

भाव तरी कसे सारे  ठेवावे मनात कोंडून,
आपल वाटता जरा कुणी जाते मौन वेस ओलांडून.

तरी खोटे त्याचे सांत्वन आणि दिलासेही खोटे,
अश्रू पुसताना का कधी त्यांची ओली होतात बोटे ?

आपल्या परक्या गणितात मनाची होते जर -तर,
कारण आडवं येतं मध्ये परकेपणाचे अंतर.

.................अमोल

gaurig

ज्याच्या जवळ करावी मनातली गुपीत उघडी,
तोच विस्कटतो मागून विश्वासाची घडी,

आपल्या परक्या गणितात मनाची होते जर -तर,
कारण आडवं येतं मध्ये परकेपणाचे अंतर.
agadi khare aahe he

santoshi.world

mastach ahe hya oli ......

ज्याच्या जवळ करावी मनातली गुपीत उघडी,
तोच विस्कटतो मागून विश्वासाची घडी,


sush

आपल्या परक्या गणितात मनाची होते जर -तर,
कारण आडवं येतं मध्ये परकेपणाचे अंतर.


[/color][font='segoe ui', helvetica, arial, sans-serif][/size][/size]सुंदर आहे कविता..[/size][/size][/font]

aspradhan


जवलचा समजावा परक्याला दुख  मोकल्या करण्यासाठी
घ्यावी ताकत पुन्हा भरून जीवनाला समोर जायसठी
हेच एक धेय्य ठेवा देण घेण भावनांच
हेच सत्य आहे तुम्हा आम्हा सर्वांच

sats

ज्याच्या जवळ करावी मनातली गुपीत उघडी,
तोच विस्कटतो मागून विश्वासाची घडी,
आपल्या परक्या गणितात मनाची होते जर -तर,
कारण आडवं येतं मध्ये परकेपणाचे अंतर.



khup chhan ahe hey ..............

PRASAD NADKARNI


umeshshirale

kharech khup chchan aahe,
pratyek line manala lagun jate,

jyala aapan jast javalache manato,
toch khup lambacha asato,

:)