संदर्भ

Started by शिवाजी सांगळे, December 08, 2017, 10:28:58 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

संदर्भ

वेळोवेळी
जोडले जातात
मनातले संदर्भ
वस्तुनिष्ठ गोष्टींशी
कधी जड, कधी तरल
तरल भावनांच्या साथीने
अन् त्यातच
शोधू लागतात
स्वतःला... व
घेतात गुरफटून
ईतरांच्या मनाला,
स्वतःसह...
धरून भावनांचे बंध
वाहतात मुक्तपणे...
कधी उदास
कधी भकास
एकाकी सुद्धा...

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९