॥ एक ओझं, जे माझं कि तुझं ॥

Started by siddheshwar vilas patankar, December 08, 2017, 07:59:17 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


आज थोडं थकल्यासारखं वाटतंय

एक ओझं, जे माझं कि तुझं

तो वरचाच जाणे

माझ्याच खांद्यावर आल्यासारखं वाटतंय

ते पाप होतं कि पुण्य होतं

तेपण तोच जाणे

पण त्या श्रापांच्या दग्धअग्नीत

मलाच जळाल्यासारखं वाटतंय

बोलतोय मी , पाहतोय मी

आजूबाजूला घडणारे सारे

ओळखतोय मी ते बदल कालानुरूप होणारे

करतोय मीमांसा मी माझ्याच अस्तित्वाची

बोट दाखवूनही पलीकडं ,

सारं माझ्याकडेच आल्यासारखं वाटतंय

मी थकलोय,  तरीही उठतो अन अखंड शोधतो मलाच स्वतःला

शोध घेऊनही सापडत नाही

आत खोलवर कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय

आठवणींची मशाल पेटवूनही काहीच आठवत नाही

वणव्यात सारं काही जळाल्यासारखं वाटतंय

फक्त हे शरीर उभे नावाला

बाकी सारं काही संपल्यासारखं वाटतंय

आज थोडं थकल्यासारखं वाटतंय ...



सिद्धेश्वर विलास पाटणकर

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

shirke

साहेब छानच जमून आलीय बरं का.. मस्तय

शिर्के

siddheshwar vilas patankar

धन्यवाद मित्रा, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

siddheshwar vilas patankar

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद . मलापण आवडलं हे माझं लिखाण ... उत्स्फूर्त कविता , जिने एका छोट्या भांडणातून जन्म घेतला

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C