शेतकरीण

Started by Asu@16, December 20, 2017, 06:10:39 PM

Previous topic - Next topic

Asu@16

  b]शेतकरीण[/b]

विटंबना झाली देवा
तुझ्या गाभाऱ्यात
बघत राहिलास तू
घातली नाही लाथ

नराधम मिरविती अजून
भ्रष्ट समाजात
कलंकिनी झाले मी
तुझ्या मंदिरात

द्रौपदीची लाज राखिली
भर दरबारात
मी काय पापिणी !
नाही दिला हात

न्याय तुझा करितो
गरिबांचा घात
दगडांच्या देवा तू
नको तुझी साथ

निःसंग झाले आता
शस्त्र घेई हातात
न्याय माझा करण्या
शक्ती या देहात

कालीचा अवतार मी
वधीन दुष्ट जमात
मीच माझी देव
माझिया मंदिरात

पापपुण्य झूठ सगळे
विकते बाजारात
श्रम - शक्ती देव माझा
मंदिर शेतात

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita