लव..

Started by Mohit Kelkar, December 22, 2017, 09:56:46 AM

Previous topic - Next topic

Mohit Kelkar

शब्दांचं माहीत नाही,
पण चेहरा सारं सांगून जातो.
ती तिच्या आयुष्यात मशगुल,
हा वेडा फुकाचे विरहगीत गातो..

प्रेमातच ओलावा नसेल,
तर शब्दात तो कुठून येणार?
हा वेडा दिवाणा मात्र,
रोज तेच रडगाणे गाणार..

आपुलकीचा जेंव्हा अस्त होतो,
तेंव्हा उरते केवळ वाक्द्वंद्व.
एक ठिणगी पडायचा अवकाश,
वणव्यात राख होतो भूतकाळ सर्व..

मग कधी आप्त कधी स्वकीय,
कधी स्वतःच काढतो स्वतःची समजूत.
केविलवाणा प्रकार सारा,
मानगुटीवर बसलेलं प्रेमाचं भूत..

वाट पाहण्यात ह्याची लागली वाट,
म्हणे आम्ही कृष्ण व राधा.
तिने धरली वेगळी वाट,
ह्याला फुकाची 'लव' ची बाधा..

                                                                 :- मोहित केळकर
मोहित केळकर