मनाचे

Started by कदम, December 22, 2017, 06:51:40 PM

Previous topic - Next topic

कदम


मनाच्या साॅफ्टवेअरमध्ये
अॅप सरसकट भरले जातात
भावनांच्या अॅप्लीकेशने
मने मनाशी जोडली जातात

नात्याने भरतो स्टोरेज
रॅम पुर्ण भरून घेतात
पर्यायी एक्सटरनल
स्टोरेज जोडले जातात

देवाणघेवाणीची असते गरज
त्याचे काही अॅप पेड असतात
पर्यायी अनऑथोराईझड
अॅप लोड केलेले असतात

शेअरींग,चॅटींग चालु
करतात एकमेकात
नेटवर्क कंजेंक्शन कमी
असले जरी दोघात

नात्यांमधील गोडवा
जसाजसा वाढू लागतो
पासवर्ड,कॅचे,कुकीज
साफ्टवेअरमध्ये जमू लागतो

कमी होतो स्पीड ईन्टरनेटचा
मग हात पाय हालवू लागतो
स्लो झालेल्या नेटवर्क कंजेक्शनचं
कारण नित्यनेमाने शोधू लागतो

मनोभावी डिवाईस नात्याचं
या साॅफ्टवेअरने चालवलं जातं
लो झाली जरी बॅटरी लेवेल
तरी ते सारखं उघडलं जातं

संजय जोशी

Excellent poem for technology people like me .... Very Well Written Kadam saheb ... pls keep writing !!

I have also tried one marathi poem 'Poti ek mulagi jarur asavi' .... first try .. pls read it and share your feedback