स्वागत नववर्षाचे

Started by Asu@16, January 01, 2018, 01:35:17 PM

Previous topic - Next topic

Asu@16

  स्वागत नववर्षाचे

झाले गेले विसरून जाऊ
चुका आपल्या ध्यानी घेऊ
नववर्षाचे स्वागत करू
पाऊल पुढचे पुढेच ठेवू

काय कमविले काय गमविले
वर्षभराचा हिशोब घेऊ
नाती नवीन किती जोडली
मनी आपल्या मोजून पाहू

दुःख दुरावे, हेवे दावे
सगळे आपण विसरून जाऊ
नव्या सकाळी, नवसूर्याचे
हर्षोल्हासे गीत गाऊ

भेदभाव विसरून सारे
आज सगळे एकत्र यारे
अन्याय, जुलूम मिटवून सगळे
होऊ आपण प्रभूचे प्यारे

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
जगणे व्हावे प्रेम गाणे
नववर्षाच्या मंगलसमयी
देवा द्यावे हेच देणे

- अरूण सु.पाटील 
 
https://www.facebook.com/AsuChyaKavita